सांगली प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्षपूर्तीनिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने भव्य तिरंगा सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली असून, विश्रामबाग चौक ते स्टेशन चौक, सांगली असा रॅलीचा मार्ग असणार आहे. सायकलिंगला प्रोत्साहन देणे, नागरिकांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाप्रती आपली निष्ठा आणि आरोग्याप्रती आपली जागरूकता व्यक्त करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी केले आहे.
‘चला सायकल चालवूया, निरोगी भारत घडवूया!’ या संदेशासह होणाऱ्या या रॅलीत सायकलस्वार तसेच ई-बाईकधारकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या