सांगली प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीने गावकुसाबाहेरची जमात नायक झाली, अन्यथा कष्टकरी दलितांची व्यथा कोणीच मांडली नव्हती शोषितांचा आवाज साहित्यरत्न आण्णाभाऊंनी जगासमोर आणला त्यांच्या कार्याची दखल सरकारने घ्यावी त्यांना भारतरत्न द्यावा असे मत सांगली महापालिकेचे नगरसेवक रवींद्र सदामते यांनी व्यक्त केले.
ते सांगलीच्या हौसाई वृद्धाश्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते, यावेळी खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, सचिव रश्मीताई भंडारे, प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ मुकुंद उदगांवकर प्रमुख उपस्थित होते.
सांगलीच्या हौसाई वृद्धाश्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीच्या निमित्ताने वृद्धाश्रमात खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचालन ऋतुजा कांबळे यांनी केले.
खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे म्हणाले,' तमाम शोषित पिढीत आणि दलितांचा हुंकार लिहिणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगाच्या फ्रेंच व रशिया या देशासहित 27 देशांत भाषांतरित झालेले आहे तर देशाच्या 14 भाषेतही हिंदी, गुजराती, मल्याळम, तामिळ, उडिया ते अनुवादित झाले, ते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत याचा अभिमान आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले यांना साकडे घालू. यावेळी संचालक महिंदा गाडे, विकास भंडारे आदींची भाषणे झाली.
याप्रसंगी हौसाई वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष जयवंत माळी, अजय पवार, विकास भंडारे, धनराज जाधव, अॅड शिवाजी कांबळे, संचालिका फर्जाना मुजावर, नजीर मुजावर, हाजी शाबाद म्हेत्तर, महेंद्र गाडे, वकील अतुल डांगे, माधवनगर ग्रामपंचायत सदस्य रेखा शेंडे, चंदन बनसोडे, संदिप कोरे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, सभासद कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या