सांगली प्रतिनिधी : लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात अकॅडमीचा राष्ट्रीय खेळाडू आदर्श अण्णाप्पा शेळके याला सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे उदयोन्मुख खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. आदर्श शेळके याची 2025 मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या 61 व्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये महाराष्ट्र संघात 14 वर्षीय मुलांच्या संघासाठी निवड झाली होती.
या गौरवाच्या औचित्याने आदर्श शेळके आणि त्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षक यांचा सत्कार शांतिनिकेतन विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक अनिल कुंभार तसेच सहायक शिक्षक सोमशेखर बिराजदार आणि संतोष पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार प्रसंगी संस्थेचे उपसंचालक व स्कूल इन्चार्ज डी. एस. माने यांनी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घ्यावी, मन-मनगट आणि मेंदू सुदृढ ठेवण्यासाठी तंदुरुस्त राहावे असा मोलाचा सल्ला दिला.
आदर्श शेळके यांना क्रीडा शिक्षक झाकीर इनामदार आणि धनंजय आवटी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम भाऊ पाटील, उपसंचालक डी. एस. माने आणि अकॅडमी इन्चार्ज डॉ. समिता पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती पाटील यांनी केले तर आभार अनिकेत शिंदे यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदर्श शेळके यांच्या या सन्मानामुळे अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या