सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने "नशामुक्ती प्रतिज्ञा 2026" हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने निवेदिता बहनजी, संतोषी बहनजी आणि लाटवडे भाई उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक श्री. महादेव ठोंबरे सर यांच्या स्वागताने झाली. यानंतर प्रा. श्री. मिलिंद कुलकर्णी सर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व आणि तरुणांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.
आदरणीय निवेदिता बहनजी यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून ज्ञानाचे व सर्वांगीण विकासाचे व्यसन लावून घ्यावे, तसेच नशामुक्त जीवनाचे फायदे याबत मार्गदर्शन केले. संतोषी बहनजी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा दिली.
संस्थेचे आजीव सदस्य तथा उपप्राचार्य डॉ. श्री. रवींद्र कुलकर्णी सर यांनी नशामुक्त अभियानाच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. बी. एस. पाटील सर यांनी केले. आभार प्रदर्शन कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. तासगावकर मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे परिषद सदस्य डॉ. श्री. विश्राम लोमटे सर, प्राचार्य डॉ. श्री. एस. डी. जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या