प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय सांगली वतीने 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त समरगीत स्फूर्तीगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये गट सांगली अंतर्गत 8 कामगार कल्याण केंद्राच्या संघांनी सहभाग नोंदवला. सांगली, इस्लामपूर, कराड, सातारा, कुंडल, माडगूळे, तासगाव, मांजर्डे येथील कामगार व कुटुंबियांचे संघ सहभागी होतें. नोंदीत कामगार आणि बांधकाम कामगार तथा कुटुंबीय सहभागी झाले.
कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. महेश पाटील सह संस्थापक त्रिची आईस्क्रीम सांगली , विशेष उपस्थितीमध्ये मा. रवींद्र केंपवाडे आर के सर्विसेस सांगली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. शिवराज काटकर तरुण भारत राष्ट्रीय अध्यक्ष व अ
आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
मान्यवर उपस्थित होतें.
कामगारांच्या कल्याणकारी उपक्रमाला सदिच्छा देत मंडळाचे पाहुण्यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून महेश कुमार नवाळे,शरद गुरव, सीमा कठमाळे
हे संगीत क्षेत्रातील जानकरांनी कामं पहिले. विजेत्या संघाना रोख रक्कमची पारितोषिके, प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत कामगार कल्याण अधिकारी मा. अरुण लाड यांनी केले. स्पर्धा संयोजन व सूत्रसंचलन केंद्र संचालक महेश रसाळ यांनी व आभार प्रदर्शन केंद्र संचालक सचिन खराडे यांनी केले आयोजनात सांगली गटातील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या