सांगली, दि. 13 : रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या वतीने भारतीय सशस्त्र दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल हेमंत अच्युत जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.कर्नल जोशी यांनी भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स मध्ये तब्बल ३० वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली असून सप्टेंबर २०२४ मध्ये ते निवृत्त झाले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारताच्या विविध सीमांवर सेवा दिली असून सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (१९ एसएसबी व ३२ एसएसबी) येथे वरिष्ठ जीटीओ व सदस्य म्हणून काम केले आहे. कपूरथळा येथील **सिलेक्शन सेंटर नॉर्थ**च्या उभारणीत व जीटीओ ग्राऊंड डिझाईनमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.एनसीसी कॅडेट्सना एसएसबी मुलाखतीसाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अशा अनुभवी अधिकाऱ्याकडून थेट मार्गदर्शन मिळण्याची ही सांगलीकरांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे सत्र विशेषतः फायदेशीर ठरणार आहे.रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष व सचिव यांनी शहरातील तरुण-तरुणी, विद्यार्थी व पालकांनी या सत्राला उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.कार्यक्रमाचा तपशील
दिनांक : 13 ऑगस्ट 2026
वेळ : सायं. 7:15
स्थळ : रोटरी क्लब ऑफ यू सांगली, ५ वी गल्ली, गणेश नगर, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या