चिंचणी येथील एम. डी. पाटील यांचे निधन
By -
ऑगस्ट २२, २०२६
0
तासगाव प्रतिनिधी : चिंचणी येथील नागरिक मोहन ज्ञानदेव पाटील (वय ६७) यांचे गुरुवारी निधन झाले. एम. डी. दादा म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. रक्षाविसर्जन रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता चिंचणी येथे आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे, दोन मुली व जावई असा परिवार आहे. एम. डी. पाटील हे गावातील सार्वजनिक कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असत. विशेषतः श्री शिवाजी स्पोर्ट्स क्लब चिंचणी या माध्यमातून त्यांनी क्रिकेट प्रेम जपले होते. अनेक खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या