सांगली दि. १२:भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत भाजपा सेवा अभियान उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमास सांगली जिल्ह्य़ातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित व नव्याने दाखल कामांचा निपटारा होण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या भाजपा सेवा अभियानात त्यांना अग्रेषित केलेली निवेदने मा. संतोषजी साखरे यांनी हाॅटेल ककून येथे दि. ११ ऑगस्ट, २०२६ रोजी स्वीकारली.विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित व नव्याने दाखल कामांचा निपटारा करण्यासाठी व शासनापर्यंत मागण्या पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे अभियान राबवले.
मा. संतोषजी साखरे यांनी प्राप्त निवेदनाबाबत लागलीच महानगरपालिका आयुक्त मा. संजीता महोपात्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विशाल नरवाडे , सांगलीचे जिल्हाधिकारी मा. मैनाक घोष यांचेकडील नागरिकांच्या कामासंदर्भात त्यांचेशी फोनवर संपर्क करुन कामांचा जलदगतीने निपटारा करणेबाबत सांगितले. तसेच विविध मंत्रालयाकडील नागरिकांच्या व विविध संघटनांच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित कामाबाबत ज्या त्या मंत्रालयीन विभागाकडे पुढील कार्यवाहीची शिफारस तातडीने केली जाईल असे सांगितले. तसेच त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना फोन करुन नागरिकांच्या कामाचा निपटारा विनाविलंब करावा असे सूचित केले.
विविध कारणांमुळे शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित व नव्याने दाखल केलेल्या नागरिकांच्या कामांमधील अडचणी दूर करुन पक्ष आणि सामान्य जनता यांच्यातील संवाद अधिक वाढवण्यासाठी व नागरिकांची कामे जलदगतीने व्हावीत यासाठी हे सेवा अभियान राबविण्यात येत आहे असे दौरा समन्वयक पृथ्वीराजबाबा पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, बभ्रुवाहन रोंगे, जेष्ठ नेते श्रीकांत शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीताई दिगडे, सौ.विजया पृथ्वीराज पाटील, योगिता राठोड, कृष्णा राठोड, विशाल पवार, केदार खाडिलकर, दीपक वायदंडे, सदाशिव पाटील, सुनीता शेरीकर, सनी धोतरे, प्रकाश पाटील, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, गोपाल मर्दा, हणमंत पवार, शेखर तोरू, अय्युब निशाणदार, प्रशांत आहिवळे, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या