प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तासगाव शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन दिन विविध माध्यमिक शाळांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?’ या विषयावर व्याख्याने तसेच चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.खंडोबाची वाडी, चिंचणी, आरवडे, मणेराजुरी व कवठेएकंद येथील शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य मस्के, एच. बी. पाटील, प्रा. वासुदेव गुरव, राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे, नूतन परिट, जिल्हा कार्याध्यक्ष अमर खोत व तालुका सचिव प्रा. संजय वावरे सहभागी झाले. संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांना शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन तासगाव अंनिसच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी अमर खोत, भरत थोरात, रवी जाधव, प्रा. वासुदेव गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या