प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : येथील ग्रामदैवत श्री सावळसिध्द मंदिराच्या ट्रष्टीचा विषय बरेच दिवसांपासून बहुचर्चित व प्रलंबित होता गावातील सर्वच प्रमुख लोकांनी एकत्र येऊन मंदिराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन ट्रस्ट स्थापन करनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
यावेळी प्रशासक तथा सरपंच मिनल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका सौ. उज्वला पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाच्या विषयांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली
प्रारंभी ही ग्रामसभा पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या बंदिस्त हॉल मध्ये घेण्याचे नियोजन केले होते मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ही ग्रामसभा पंचायतीच्या समोर खुल्या मैदानात घेण्यास भाग पाडले यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सभेत श्री सावळसिध्द मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी सर्व समाज समावेशक स्वतंत्र नवीन ट्रस्ट स्थापन करावे असा ठराव मांडण्यात आला आणि ठरावाला सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा देत मंजुरी दिली.
तसेच गावातील इतर प्रमुख मंदिरांचे सुद्धा ट्रस्ट करण्याची मागणी केली येथील श्री महादेव मंदिर पुजारी व्यवस्थापन नेमणूक ही करण्यात आली यावेळी वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी आगामी यात्रा भरविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली ग्रामसभेत आगामी सण उत्सव आणि डॉल्बी सिस्टीमच्या वापराबाबतचा विषय निघताच सभागृहात दोन भिन्न मतप्रवाह समोर आले गावातील तरुण आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव उत्सवात साजरा करण्यासाठी डॉल्बीला परवानगी मिळावी अशी मागणी लावून धरली दुसरीकडे गावातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती आणि लहान मुलांचे आरोग्याचा विचार करता डॉल्बी वरील बंदी कायम असावी असा सूर जेष्ठ ग्रामस्थांनी आळवला या ग्रामसभेत विकास कामे आराखड्यावर चर्चा करण्यात आली ग्रामस्थांनी कमालीचा संयम दाखवत संपूर्ण सभा शांततेत व खेळीमेळीत पार पाडली यावेळी जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट विजय धेंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील पंचायत समिती सदस्य ऋषिकेश बिरणे ताजुद्दीन तांबोळी आनंदराव पाटील महादेव चिवटे बाबुराव दादा पाटील उपसरपंच रमेश कांबळे संदीप पाटील शिवसेनेचे अनिल शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या