प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
सांगली:सांगली जिल्हा वायरमन युनियनतर्फे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.याचवेळी युनियनच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.युनियनच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अॅड. अमित शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण व ध्वजाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम पार पडला.निवृत्त आर्मी जवान सचिन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत वायरमन बांधवांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.नव्या जिल्हा संपर्क कार्यालयामुळे जिल्ह्यातील वायरमन बांधवांना संघटनेशी संपर्क साधण्यासाठी तसेच विविध प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.कार्यक्रमास युनियनचे अविनाश कदम, झाकीर पकाली, खंडू वाघमारे, राहुल मिसाळ, दीपक शिंदे, प्रथमेश माळी, प्रशांत संकपाळ, अनिकेत आंबुळे यांच्यासह युनियनचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या