दोंडाईचा : श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी. एड. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या नामविस्तार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.सर्वप्रथम प्रा.आर. पी. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश प्रास्तविकेतून स्पष्ट केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बहिणाबाई चौधरी व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. उमा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे विद्यापीठ गीत सादर केले. त्यानंतर बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यात रूपाली बागुल,अदिती चौधरी,विशाखा गिरासे, उर्मिला गोराणे, उमा पाटील, तृष्णाली गोसावी, चेतना दातेराव, हर्षाली माळी,संगीता पाटील, निकिता रावल, भावना बिरारे, अजय पवार, अंकिता निरमली, राजश्री राजपूत व प्रियंका पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी 'भाषेचे महत्व' या विषयावर आपले विचार सादर केले. त्यांनी सांगितले की, "जीवन विकासासाठी भाषा आवश्यक आहे. आपल्या भाषेचा सर्वांना अभिमान असतोच. आपली बोलीभाषा आपण प्रमाण भाषेपेक्षा कमी मानतो, हे अयोग्य आहे. अहिराणी भाषा लिहायला अतिशय अवघड आहे. आपल्या अहिराणी भाषेतून खानदेशी अस्मिता जोपासली जाते आणि त्यामुळे अशा कार्यक्रमांमधून आपण अहिराणी भाषेचा गौरव करीत असतो" प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले. त्यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे सार्थ नाव देण्यात आले आहे. कारण त्यांचे काव्य आपल्या खानदेशी संस्कृतीतून निर्माण झालेले आहे. त्यांच्या कविता प्रासादिक व सर्वांना सहज समजणाऱ्या आहेत. सुख,दुःख, वेदना,श्रम, संसार हा त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. तसेच जीवनमूल्ये जोपासणारे व जीवन शिक्षण देणारे त्यांची काव्य आहे. त्यामुळे खानदेशी मातीशी एकरूप होणाऱ्या त्यांच्या कविता आहेत"चेतना दातेराव यांनी सूत्रसंचालन तर प्रियंका पाटील यांनी आभार अभिव्यक्ती केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्रा. पी. डी. बोरसे व प्रा. एस. एम. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.आर.पी. पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रेवती बागुल, प्रा. अमृता चव्हाण, प्रा. पी. एल. खाचणे, प्रा. बी. टी. शेजाळ, प्रा. मंजुषा बावने व प्रा. निशा ठाकूर यांनी प्रयत्न केले. तर शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या