सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यातल्या सरकारने पावसाळी अधिवेशना मध्ये जबरदस्तीने, फसवणूकीने, अमिष दाखवून धर्मांतरण करणाऱ्यास दहा वर्षे कारावासाची शिक्षा. तसेच बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशाने केलेला कोणताही विधीपूर्वक विवाह न्यायालयात रद्द होणार, धर्मांतरातून झालेल्या विवाह नंतर जन्मलेल्या बालकाला आईचा धर्म लागू होणार. असा कायदा केलेला आहे म्हणून आज हिंदू एकता आंदोलनातर्फे स्टेशन चौक, बाळासाहेब ठाकरे चौक सांगली येथे अतिषबाजी करून, साखर वाटून जल्लोष करण्यात आला.
*यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण देशाला धर्मांतरापासून मोठा धोका असून एकीकडे मुस्लिम राष्ट्र आर्थिक पुरवठा करून लव्ह जिहाद्याच्या माध्यमातून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतरण करून हा देश इस्लामी राष्ट्र बनवायचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे ख्रिश्चन राष्ट्रांच्या पैशाच्या जोरावर ख्रिश्चन मिशनरी हिंदू धर्मातील गोरगरीब समाजाचा गरिबीचा, अशिक्षित पणाचा, रोजगार नसलेल्याचा गैरफायदा घेऊन हिंदू लोकांना धर्मांतरण करून त्यांना ख्रिश्चन बनवायचे काम करत आहेत व हे राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र बनवायचा प्रयत्न करत आहेत. बारा राज्यातील सरकारने धर्मांतर विरोधी कायदा केला होता व महाराष्ट्र सरकारने तो कायदा केला नव्हता तो धर्मांतर विरोधी कायदा करा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलना सह हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे, आंदोलने करून धर्मांतर विरोधी कायदा करायला सरकारला भाग पाडले. या कायद्यामुळे धर्मांतरण करणाऱ्याला कायद्याने चाप बसणार आहे.
यावेळी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे, विजय दादा कडणे, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, राजू जाधव, सोमनाथ गोटखिंडे, पै. प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, करण पवार, प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, बाळासाहेब बेलवरकर, बाळासाहेब मोहिते, विनायक ठोंबरे, गोपाळराव माने,श्रीपाद होमकर, विकास आवळे, रवींद्र वादवणे, भूषण गुरव, प्रकाश निकम, नितिन बोरावत, कृष्णा नायडू, प्रेम देसाई.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या