प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त देवस्थान मठ, संजीवनगिरी, आडी यांच्या वतीने सर्वेज्य सांस्कृतिक भवन येथे भव्य प्रवचन कार्यक्रम झाला.यावेळी मठाधिपती परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी संकुचित विचारसरणीचा त्याग करून सर्वधर्मसंमत, मानवकल्याणाचा सन्मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.मानवी जीवनात ज्ञानाचे महत्त्व, सद्गुरूंचे स्थान, मानवता, प्रेम, सत्य आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत त्यांनी परमाब्धी ग्रंथातील तत्त्वज्ञान स्पष्ट केले. सर्व धर्मांचे अंतिम सत्य एकच असून, मानवतेच्या कल्याणाचा मार्गच खरा सन्मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच श्री दत्तगुरू व सद्गुरू परमात्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. म्हाकवे येथील भाविकांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, पृथ्वीराज पाटील (सांगली), विनायक (आप्पी) पाटील, प्रल्हाद पाटील (खडकलाट), वैज्ञानिक दत्ता म्हेत्रे, प्रसन्नकुमार गुजर (निपाणी), राजू पवार, सदाशिव वाळके, महादेव वाळके (अकिवाट), भगवान मगदूम (हैदराबाद), सचिन खोत (हणबरवाडी), अजित पाटील (बेनाडी), गणपती गोठणे (सांगाव), बसगोंडा पाटील (भोजवाडी), सुवर्णा कांबळे (सोळांकूर), ऋषिकेश लोखंडे (मसूर, सातारा), अभिजीत वेदपाठक (सांगली), अण्णासाहेब बाबर (पुणे) आणि राजेंद्र डोंगरे (मत्तिवडे), शिवानंद राजमाने (हंचिनाळ) यांच्यासह विविध मान्यवर व देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांसह विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या