गगनबावडा : कळे येथे आयोजित 'समृद्धी टॅलेंट सर्च' परीक्षेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत श्री माधव विद्यालय, गगनबावडा येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु. साहिल सुधीर नारकर याने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णमय यश संपादन केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते साहिल नारकर याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याचे पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयाचा डंका!
केवळ समृद्धी टॅलेंट सर्चच नव्हे, तर शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्येही श्री माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली आहे. विद्यालयातील एकूण ४ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत:
साहिल सुधीर नारकर (जिल्ह्यात प्रथम)
आरोही कांबळे
राजकुमार कुरुडे
प्रणय परीट
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, तसेच श्री माधव विद्यालय गगनबावडा परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. साहिल नारकर आणि इतर सर्व पात्र विद्यार्थ्यांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या