सांगली प्रतिनिधी :येथील सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूल या प्रशालेत गुरुपौर्णिमा तथा व्यासपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.. तसेच शाळेचा सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन संपन्न झाले.
सरस्वती, व्यासप्रतिमा आणि ग्रंथ पूजनाने आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. याच वेळी विद्यार्थिनींनी इशस्तवन आणि गुरुवंदना गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उपस्थितांचे स्वागत आणि परिचय ज्येष्ठ शिक्षक विजयकुमार विभुते यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गुरुपौर्णिमा तथा व्यासपौर्णिमेचे औचित्य आणि महात्म्य विशद केले. महर्षी व्यासांची जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आणि प्रशालेतील सर्व गुरूंचा सन्मान संपन्न झाला.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशालेचे माननीय माजी मुख्याध्यापक मधुकर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात आई हा आपला आद्य गुरु असल्याचे आणि प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत त्यांनी विशद केले त्याचबरोबर वडील तसेच शाळेतील गुरुवर्य यांचे विद्यार्थी दशेतील महत्त्व , त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण योगदान, सांगितले. गुरुपौर्णिमा म्हणजे या सर्व गुरुप्रति आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांनी दिलेल्या संस्काराचा आजन्म स्वीकार आणि अंगीकार करून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याच्या संकल्प, निर्धार करण्याचा दिवस असल्याचे मत त्यांनी प्रतिपादन केले.
त्यानंतर अध्यक्षीय मनोगतात प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक सुरेश गोडे यांनीही प्रत्येक व्यक्ती आपल्या नीजी जीवनात लहान मोठ्या सर्वच घटकांकडून काही ना काही तरी शिकत असते त्याचबरोबर निसर्गही आपला एका अर्थाने गुरुच असतो असे प्रतिपादित केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक अरुण मिरजकर यांनी केले. तर सूत्रसंचालन अंजली डफळापुरकर यांनी केले याप्रसंगी पर्यवेक्षक विद्या जाधव, कार्यक्रम प्रमुख हेमलता अष्टेकर, ज्येष्ठ शिक्षक बोदगीरे सर, उज्वला माळी, उमेशचंद्र महामुनी आदि. उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी खाडीलकर,सागर सगरे, बाळकृष्ण महाले यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या