प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : क्रीडा भारती आणि विजयंत मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स मारुती चौकात झालेल्या लेझीम स्पर्धेत बलभीम व्यायाम मंडळ संघाने प्रथम,विद्यामंदिर,नृसिंह वाडी संघाने द्वितीय व मालू हायस्कूलच्या ब संघाने तृतीय क्रमांक पटकावला. पहिल्या,दुसर्या व तिसर्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला अनुक्रमे ₹ दहा हजार,सात हजार व पाच हजार रकमेचे रोख बक्षिस व स्मृतीचिन्ह देण्यात आले*
तसेच मानस शिंदे यांना उत्कृष्ट कैताळ वादक,सौ.मधुरा लिमये यांना उत्कृष्ट घुमके वादक, प्रसाद कुलकर्णी यांना उत्कृष्ट हालगीवादक तर विद्यामंदिर, नृसिंहवाडीचा खेळाडू रणवीर माने यास उत्कृष्ट लेझीम पटू म्हणून गौरविण्यात येऊन बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले होते. सर्वश्री सुधीर वाटवे, श्रीकांत नाडगौडा, अरुण पळसुले व महेश खाडिलकर यांनी पंच म्हणून कम पाहिले आणि क्रीडा भारतीचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रा.अशोकराव काळे यांनी स्पर्धाप्रमुख व मुख्य सामनाधिकारी म्हणून काम पाहिले.विजेत्यांना बक्षिसे विजयंता मंडळाचे आधारस्तंभ पै.पृथ्विराज भैय्या पवार व मंडळाचे अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना,लेझीम सारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात विजयंता मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला असून इतरही देशी पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात सहकार्य करू असे सांगून लेझीम खेळाच्या खुल्या गटाच्या स्पर्धा घेण्याचं आवाहन पै.पृथ्वीराज भैय्या पवार यांनी केले.
प्रास्ताविक क्रीडा भारती सांगलीचे कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तर बक्षिस वाचन आणि सूत्रसंचालन क्रीडा भारतीचे सांगली जिल्हा मंत्री संजय देव यांनी केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा भारती सांगलीचे स्वप्नील शिंदे,संतोष कोळी,सुनिल सुतार,एकनाथ कौटे यांनी तर विजयंत मंडळाचे पै. पृथ्वीराज पवार भैय्या, मंडळाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील,उपाध्यक्ष सतीश पवार विजय साळुंखे अमर चित्रे मामा,कैलाससिंग रजपूत,रामचंद्र देशपांडे राजू बावडेकर, विलास शिंदे, सचिन घेवारे, गोपाल पवार, उदय मुळे, निलेश जगदाळे,सोहम रिसवडे, यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या