गगनबावडा : स्वतंत्र भारत विकास सेवा संस्था मर्यादित गगनबावडा या संस्थेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ६ सप्टेंबर २०२६ रोजी चेअरमन श्री. मारुती भागोजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
सभेची सुरुवात श्रद्धांजलीने झाली. सचिव श्री. मनोहर यशवंत बोरये यांनी अहवाल वाचन केले. संस्थेने नेहमीप्रमाणे पाच वर्षांमागील ठेवी व व्याज सभेच्या पाच दिवस आधीच सभासदांच्या के. डी. सी. सी. बँक खात्यावर जमा केले आहे. तसेच यंदा सभासदांना ३ टक्के लाभांश (डिव्हिडंट) जाहीर करण्यात आला असून ही रक्कम गौरी-गणपती सणापूर्वी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१०१ सभासद, ₹६,८६,९७० ठेवी, ₹६,७६,२३० शेअर्स भांडवल आणि 'ब' ऑडिट वर्ग असलेल्या या संस्थेच्या सभेच्या शेवटी माजी चेअरमन श्री. तुकाराम पारगावकर यांनी आभार मानले व अल्पोपहारानंतर सभा संपन्न झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या