गगनबावडा : श्री लक्ष्मी देवी विकास सेवा संस्था मर्यादित सैतवडे (ता. गगनबावडा) या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ६ सप्टेंबर २०२६ रोजी चेअरमन श्री. गोविंद लक्ष्मण तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
सभेची सुरुवात भावपूर्ण श्रद्धांजलीने झाली. सचिव श्री. मनोहर यशवंत बोरये यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. संस्थेने परंपरेनुसार पाच वर्षांमागील ठेवी व त्यावरील व्याज सभेच्या पाच दिवस आधीच सभासदांच्या के.डी.सी.सी. बँक खात्यावर जमा केले आहे. तसेच, या वर्षी सभासदांना ३ टक्के लाभांश (डिव्हिडंट) मंजूर करण्यात आला असून ही रक्कम गौरी-गणपती सणापूर्वी खात्यावर जमा केली जाणार आहे.
१६० सभासद संख्या, ₹३१,६६,१८५ ठेवी, ₹१९,५१,३३० शेअर्स भांडवल आणि 'ब' ऑडिट वर्ग असलेल्या या संस्थेच्या सभेच्या शेवटी संस्थापक श्री. पांडुरंग गणपती पडवळ (आप्पा) यांनी आभार मानले व अल्पोपहारानंतर सभा संपन्न झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या