सांगली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि प्रतिष्ठा फौंडेशन, महाराष्ट्र आणि प्रतिष्ठा न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६’ सांगली येथील रोटरी क्लब हॉल येथे उत्साहात पार पडला.
शिक्षण, उद्योग, समाजसेवा, कृषी, कला, संगीत, सामाजिक कार्य आणि युवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय माजी सैनिक परिषद, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष कर्नल हेमंत जोशी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप साळुंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम उपस्थित होते.
गुरुवर्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक तानाजीराजे जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार वैभव बंडगर यांनी मानले. सौ. विद्या जाधव, पूर्णांक जाधव यांनी संयोजन केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गुरूवर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गुरुवर्य उद्योगरत्न पुरस्कार डॉ. मारूती पवार (स्टील मॅन), सौ. जया प्रशांत भामरे आणि सौ. सुषमा कृष्णात जाधव यांना, तर गुरुवर्य शिक्षणरत्न पुरस्कार प्राचार्य एम. एम. राजपूत आणि प्रा. रोहित पाटील, डॉ. शिवाजी जगताप, प्रा. रमेश कट्टीमणी आणि प्रा. डॉ. चित्रा आष्टेकर यांना प्रदान करण्यात आला.
समाजरत्न पुरस्काराने १२ मान्यवरांचा गौरव
गुरुवर्य राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार यामध्ये डी. जी. मुलाणी, बजरंग नामदेव खुटाळे, ॲड. मोहन शुक्ला, श्री. जितेंद्र कांबळे, आर्मी कमांडो श्री. आसलम मुल्ला, श्री. रघुनाथ संताराम सातपुते, श्री. प्रभाकर थोरवडे, श्री. संजयकुमार कोळी, सर्पमित्र श्री. गजानन जाधव, ह.भ.प. सौ. शालिनीताई मोरे आणि श्री. के. बी. चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.
गुरुवर्य राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे यांना प्रदान करण्यात आला.
गुरुवर्य राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार श्री. चंद्रशेखर नारायण देशमुख आणि सौ. अंजली विश्वनाथ देसाई यांना देण्यात आला.
गुरुवर्य राज्यस्तरीय सरपंचरत्न पुरस्कार सौ. वैशाली विक्रम पाटील यांना प्रदान करण्यात आला.
गुरुवर्य राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने ज्येष्ठ निवेदक श्री. विजयदादा कडणे आणि ज्येष्ठ वादक कलाकार, संगीत निर्माता श्री. अतुल शहा यांचा सन्मान करण्यात आला.
तर गुरुवर्य राज्यस्तरीय कृषी उद्योगरत्न पुरस्कार डॉ. विजय हनुमंत मोरे यांना प्रदान करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या