प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराचा तासगावातून शुभारंभ करण्यात आला.पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील प्रचाराचे नियोजन करण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गावडे यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे हे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) त्यांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली आहे.निवडणुकीच्या तयारीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शाखाप्रमुख,तालुकाप्रमुख व समर्थकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये प्रचार कसा राबवायचा, शिक्षक मतदारांशी संपर्क कसा वाढवायचा आणि पुढील महिनाभरातील प्रचाराचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली.बैठकीनंतर तासगावचे ग्रामदैवत श्री गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी संघटितपणे व जिद्दीने प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी संस्थेचे आजीव सेवक एच.बी.पाटील सर,मस्के सर,अशोक पवार सर,बेडगे सर, हाके सर,सांगली जिल्हा सहाय्यक विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.सुरेश एस.पाटील,प्राचार्य डॉ.एल.जी. जाधव,प्राचार्य डॉ. ए.एन.पाटील, प्रभारी प्राचार्य रामगर,प्रभारी प्राचार्य डॉ.ए.पी.जाधव,सांगली जिल्हा विद्यसमितीचे सचिव होरे सर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाखाप्रमुख व तालुकाप्रमुख उपस्थित होते.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे,कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. २०२६ च्या अंतिम मतदार यादीत विभागातील शिक्षक मतदारांची संख्या सुमारे ५२ हजार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.आगामी काळात सांगली जिल्ह्यातील शिक्षक मतदारांशी संपर्क वाढवून प्रचाराला व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. पुढील महिनाभर सर्वांनी एकजुटीने आणि जिद्दीने प्रचार मोहीम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या