प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील वंजारवाडी येथे नवीन मतदार नोंदणीबाबत चौकशी केली म्हणून शिवीगाळ करून गचुट धरत मारहाण केल्याची तक्रार तासगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 115(2) व 352 अन्वये अदखलपात्र अहवाल (NCR) क्रमांक 1231/2026 नोंदविला आहे.पोलिस नोंदीनुसार,फिर्यादी बजरंग बाळासो चवदार (वय 33, व्यवसाय शेती, रा. वंजारवाडी, ता. तासगाव) हे दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन मतदार नोंदणीबाबत विचारपूस करण्यासाठी गेले होते.
यावेळी तेथे शहाजी अंतू खरमाटे (रा. वंजारवाडी) हे आले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार,त्यांनी ‘तू ग्रामसभेत प्रश्न विचारतोस’ असे म्हणत शिवीगाळ केली तसेच गचुट धरून बुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेबाबत फिर्यादीने तासगाव पोलीस ठाण्यात समक्ष तक्रार दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या