सांगली, दि. २ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा – सांगलीची सन २०२५–२६ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेत वार्षिक अहवाल, आर्थिक ताळेबंद, आगामी वर्षाचे अंदाजपत्रक आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी परिषदेचे संचालक सचिन पारेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर कुलदीप देवकुळे यांनी श्रद्धांजली व अभिनंदनाचा ठराव सभेपुढे मांडला.
परिषदेचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी सन २०२५–२६ या वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला.
कोषाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वार्षिक जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करताना सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकही मांडले. तसेच पुढील आर्थिक वर्षासाठी लेखापाल नेमणुकीस सभेची मंजुरी घेण्यात आली.
अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी प्राप्त झालेल्या विविध विषयांवर सभासदांनी सकारात्मक चर्चा केली. परिषदेच्या आगामी उपक्रमांबाबतही सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. अखेरीस उपाध्यक्षा सौ. अंजली भिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, उपाध्यक्षा सौ. अंजली भिडे, प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी, कोषाध्यक्ष प्रशांत जगताप, सहकार्यवाह अपर्णा गोसावी, कार्यकारी संचालक श्रीनिवास जरंडीकर, प्रशांत गोखले, कुलदीप देवकुळे, रामचंद्र कोटणीस, सचिन पारेख, मकरंद कुलकर्णी यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, राजेंद्र पोळ, केदार खाडिलकर, भालचंद्र चितळे, शशांक लिमये, चिंतामणी सहस्रबुद्धे, योगेश वाटवे, अनिरुद्ध जेरे, रमेश पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, प्रमोद लाड, प्रकाश पाटील तसेच परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा अत्यंत सकारात्मक, उत्साहपूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या