प्रतिष्ठा न्युज/ अक्षय कोठावळे
हातकणंगले : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हातकणंगले यांच्या वतीने रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी हातकणंगले येथे भव्य रोजगार मेळावा व विविध जनसेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिकांना रोजगाराच्या संधी व विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर युवक-युवतींना सहभागी होता येणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विविध रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रोजगार मेळावा सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. इच्छुकांनी २२ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले असून, आधार कार्डवरील फोटो, नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच इतर आवश्यक दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच NCMC स्मार्ट कार्ड / ST हाफ तिकीट कॅम्प आयोजित करण्यात आला असून, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, विद्यार्थी व इतर पात्र लाभार्थींना नियमानुसार उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक प्रक्रिया करण्यात येणार आहे.
हे सर्व उपक्रम मराठी शाळा, पाच टिकटी, हातकणंगले येथे आयोजित करण्यात आले आहेत.
या जनसेवा उपक्रमाचे आयोजन अमित खोत, दिपक कुण्णूरे, अनिस मुजावर, इम्रान चौधरी, पलाश स्वामी, रामदास पांडव, बाबासाहेब ठोंबरे, मनीषा दबडे, स्नेहल शंभु मोरे, अश्वराज शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हातकणंगलेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
हातकणंगले परिसरातील गरजू नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनसेवा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या