प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील माळी समाज कार्यालयात सोमवारी बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत अक्कमहादेवी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली.यावेळी मंडळाच्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मंडळाच्या प्रथम अध्यक्षपदी सुजाता म्हेत्रे,उपाध्यक्षपदी साक्षी कलढोणे,सचिवपदी अर्चना लांडगे यांची निवड करण्यात आली.तसेच सहसचिवपदी अस्मिता एरंडोले, खजिनदारपदी निशिगंधा बेडगे,तर सहाय्यक खजिनदारपदी गौरी करगणे यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीस मणेराजुरी पंचायत समिती गटाच्या पंचायत समिती सदस्य संगीता लांडगे तसेच शिवप्रसाद महिला मंडळ, सांगलीच्या अध्यक्षा सुरेखा कलढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.सल्लागार मंडळामध्ये कल्पना चौगुले, संगीता लांडगे, सुरेखा कलढोणे,रंजना बेडगे आणि सुनीता म्हेत्रे यांची निवड करण्यात आली.मंडळाच्या स्थापनेसाठी परिसरातील बहुसंख्य महिलांनी उपस्थिती दर्शविली. संचालक मंडळ व सदस्यांसह एकूण ५५ महिलांची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी शिवप्रसाद महिला मंडळ, सांगलीच्या अध्यक्षा सुरेखा कलढोणे यांनी नवनियुक्त संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक व विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी अक्कमहादेवी महिला मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या