प्रतिष्ठा न्यूज
विजयपूर प्रतिनिधी : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या विजयपूर जिल्हाध्यक्षपदी दीपक शिंत्रे, तर उपाध्यक्षपदी डॉ. सदाशिव पवार यांची एक वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली आहे.
कलबुरगी येथे आज राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही निवड करण्यात आली. सरकार्यवाह प्रा. विजयकुमार चौधरी, उपाध्यक्ष बी. ए. कांबळे, कार्यवाह प्रभाकर सलगरे, कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर, प्रमोद शहा, डॉ. दिनकर मोरे, नरसिंग मराठे, प्रा. हणमंत बिराजदार, नरसिंग पाटील, दयानंद सुरवसे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या अविरोध निवडीला मान्यता दिली.
विजयपूर जिल्हाध्यक्ष दीपक शिंत्रे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. कार्यवाहपदी कवी मारुती तरसे, सहकार्यवाहपदी सौ. लताताई झिंगाडे, तर खजिनदारपदी कन्हैया पेठकर यांची निवड करण्यात आली.
तसेच डॉ. प्रा. एस. जे. जहागिरदार, प्रा. गंगाधर गेंड, सौ. रुपा हिबारे, सौ. अंजली गिरगांवकर, सौ. कावेरी गजाकोष आणि श्रीपाद पाटणकर यांची विजयपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून विजयपूर जिल्ह्यात मराठी साहित्य, भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी अधिक व्यापकपणे कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या