प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तासगाव शहरप्रमुखपदी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली.मुंबई येथील शिवसेना भवनातून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख डॉ.ज्ञानेश्वर जगताप यांनी मुंबईहून तासगाव येथे येऊन प्रमोद सावंत यांच्या शहर प्रमुखपदाची निवड जाहीर केली. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी सावंत यांचे अभिनंदन करून आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.प्रमोद सावंत यांच्या निवडीमुळे तासगाव शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून, आगामी काळात शहरातील विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या