सांगली, दि. १ ऑगस्ट : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली नगरवाचनालयात मांगल्यपूर्ण वातावरणात अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात नगरवाचनालयाचे अध्यक्ष श्री. विकास जोशी यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर वाचकांनी दोन्ही महान व्यक्तींच्या साहित्यसंपदेतील निवडक लेखांचे अभिवाचन केले.
या अभिवाचनात श्री. संभाजी दाणेकरी, श्री. मकरंद जांबळे, श्री. सदाशिव कांबळे, श्री. नंदकुमार गोसावी, श्री. प्रवीण कुलकर्णी, श्री. भगवान कुलकर्णी, सौ. अनुपमा अवसरीं, सौ. अवनी कुलकर्णी, सौ. पूर्वा कुलकर्णी, सौ. लक्ष्मी तावरगेर, सौ. गुळवणी यांनी सहभाग घेतला. बाल वाचक म्हणून कु. आर्णा बेलवलकर व चि. अमेय फडके यांनीही वाचन केले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन वाचनालयाचे कार्यवाह श्री. सुहास करंदीकर, संचालक श्री. प्रमोद बापटसर, ग्रंथपाल सौ. सुरेखा नाईक, उपग्रंथपाल श्री. सुर्यवंशी तसेच ग्रंथालयातील इतर कर्मचाऱ्यांनी केले.
या उपक्रमामुळे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यनिर्मितीतील सामाजिक जिद्द आणि लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी कार्याची आठवण नागरिकांना ताजी झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या