सांगली प्रतिनिधी : आज ऑगस्टचा पहिला रविवार सर्वत्र पाश्च्यात्य पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा होत असताना डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप सन २००० पासून दरवर्षी अनोख्या पद्धतीने हा मैत्री दिवस साजरा करतो. डॉल्फीन संस्थेतर्फे यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मजले या गावी आवश्यक त्या ठिकाणी डोंगर पायथ्याशी व उतारावर वृक्षारोपण व बीजारोपण करून निसर्गाशी मैत्री साधली. , करंज, जांभूळ, कडूनिंब, सिताफळ, चिंच , पळस , चेरी यासारखे उपयुक्त रोपे लावण्यात आली . तर कांचन, उंबर , अर्जुन , ताम्हण, कडूनिंब , करंज , काटेसावर, शाल्मली पळस, बेल यासारख्या देशी व स्थानिक उपयुक्त झाडांच्या बियाही प्रत्यक्ष टोकण्यात आल्या.
संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांच्या संकल्पनेतून गेली २७ वर्षे निसर्गाशी मैत्री हा उपक्रम डॉल्फिन नेचर ग्रुप तर्फे अविरतपणे सुरु आहे . यामध्ये युवा पिढी ही सहभागी होते. आजही चला साधू या निसर्गाशी मैत्री हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. डॉल्फिन ग्रुपचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे, उपाध्यक्ष मिलिंद सूर्यवंशी, अर्चना ऐनापुरे, वंदना राजमाने, ग्रामस्थ रविंद्र पाटील व पद्मजा पाटील यांनी या प्रकल्पाचे संयोजन केले. तर यावेळी मनोजकुमार मुळीक , प्रा. बाळासाहेब शितोळे, दिनेश पाटील , पुष्कर मगदूम , प्रवीणकुमार मगदूम , आदिती कुंभोजकर, लता कदम, पवन भोकरे, केतकी कुंभोजकर आदी डॉल्फिनचे सदस्य सहभागी झाले होते. पुतळाबेन शहा बी एड कॉलेज चे विजया लोखंडे व काही विद्यार्थी तसेच, मीनाक्षी मगदूम, मजले गावचे सचिन पाटील अमित मगदूम व ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.
यावेळी निसर्गमित्र कार्यशाळेचेही संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शशिकांत ऐनापुरे, आदिती कुंभोजकर, पद्मजा पाटील, अर्चना ऐनापुरे, आदी यांनी या कार्यशाळेमध्ये विविध पर्यावरण विषयांवर मार्गदर्शन केले. तर ऋषिकेश सामंत, गोरख होर आदी उपस्थित विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना डॉल्फिनच्या या उपक्रमाचे व एकूणच कार्याचे कौतुक केले व यापुढे यासारख्या निसर्ग संवर्धन विषयक उपक्रमामध्ये डॉल्फिनच्या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वी सागरेश्वर अभयारण्य क्षेत्रात १६ वर्षे वृक्षारोपण , बीजारोपण , वनबंधारे उभारणी तसेच निसर्ग मैत्री कार्यशाळा,अशा विविध कार्यक्रमातून तसेच आटपाडी तालुक्यातील मानेवाडी येथे तीन वर्षे हा प्रकल्प राबविण्यात आला होता. या पद्धतीने डॉल्फिन वेगळ्या भागात अशा प्रकारे गेली २७ वर्षे अनोख्या पद्धतीने निसर्गाशी मैत्री साधत आहे.
डॉल्फिन नेचर ग्रुप तर्फे १९९७ पासून पर्यावरणरक्षणा बरोबरच पर्यावरण विषयक जनजागृतीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात जातात .
मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यामध्ये हरवत चाललेल्या व निसर्गापासून लांब निघालेल्या युवा पिढीस पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात आणणे व यानिमित्ताने निसर्गा विषयी, निसर्ग संवर्धनाविषयी त्यांच्यामध्ये ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने अशाप्रकारे सन २००० पासून गेली २७ वर्षे हा उपक्रम अविरतपणे राबवीत आहोत. या उपक्रमात अनेक विद्यार्थी व युवा वर्ग सहभागी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या