प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : इयत्ता दहावीच्या नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाने स्वीकारली जबाबदारी
मिरज: आयडियल स्मार्ट स्कूल सीबीएसई स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारा विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आरटीओ विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत वाघ तसेच हेड कॉन्स्टेबल नालबंद उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे व समन्वयक श्री. विश्वासराव पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी मंत्रिमंडळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज व पद प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी शाळेची शिस्त, एकता, गुणवत्ता आणि शैक्षणिक प्रगती यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली.
नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळ
अध्यक्ष – वेदांत रोडे
उपाध्यक्ष – भक्ती जोशी
विरोधी पक्षनेते – अद्विता कोल्हार
आरोग्य मंत्री – अनन्या जाधव
सांस्कृतिक मंत्री – सोनाक्षी मेघानी
STEAM मंत्री – समर्थ गंगधर
पर्यटन मंत्री – इरम मुतवली
क्रीडा मंत्री – नम्रता रोहिदास
प्रवक्ते – अक्षरा गोरड
प्रशासक – अखिल उपाध्ये
प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांत वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “खरे नेते अनुयायी तयार करत नाहीत, ते आणखी नेते तयार करतात,” असे सांगत जबाबदारी, शिस्त, कायद्याचे पालन आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. श्री. नालबंद यांनीही नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाला शुभेच्छा देत प्रेरणादायी विचार मांडले.
संपूर्ण पदग्रहण सोहळ्याचे नियोजन व आयोजन शिक्षिका सौ. राजलक्ष्मी शेळके आणि श्री. अमोल गावडे यांनी मुख्याध्यापिका व समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता आणि लोकशाही मूल्यांची रुजवण करणारा हा पदग्रहण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या