सांगली प्रतिनिधी: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने दिव्यांग बांधवांसाठी विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (MNGL) CSR उपक्रमांतर्गत आणि भारत विकास परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्यांग शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
दिव्यांग बांधवांना आवश्यक आधुनिक कृत्रिम अवयव उपलब्ध करून देत त्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, म. के. आठवले शाळा, विनय मंदिर, राजवाडा परिसर, सांगली येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय, कृत्रिम हात तसेच कॅलिपर यासाठी आवश्यक मोजमाप पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, ५० हजार रुपयांपर्यंतचे आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय पात्र लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू दिव्यांग बांधवांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील हालचाली अधिक सुलभ व्हाव्यात, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व पूर्वनोंदणीसाठी संपर्क :
मोहन : ९४२२५२२२१९
गिरीश : ९४२२०४१०८४
शिबिराची तारीख : रविवार, २३ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ९ ते दुपारी ३
स्थळ : म. के. आठवले शाळा, विनय मंदिर, राजवाडा परिसर, सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या