प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :पावसामुळे प्रभाग क्रमांक २ मधील खिचडे मळा, दरेकर वस्ती, माईणकर वस्ती,अष्टेकर मळा,खोरे मळा, चिंचणी रोड, खुजट मळा,पुंदि रोड यांसह विविध भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात तात्पुरता उपाय म्हणून रस्त्यांवर मुरूम टाकून रोलरच्या सहाय्याने सपाटीकरण करावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अरुण प्रकाश साळुंखे यांनी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अपघाताची वेळ येण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी,अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या