प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध भागांमध्ये पडलेले मोठमोठे खड्डे तातडीने मुजवावेत,तसेच शहरातील सर्व क्रीडांगणे व उद्यानांची नियमित स्वच्छता करावी,अशी मागणी सार्वजनिक बांधकाम सभापती तथा उपनगराध्यक्षा सौ. दिपालीताई दिग्विजय पाटील यांनी केली आहे.याबाबत त्यांनी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांना निवेदन दिले.तासगाव शहरातील विविध रस्त्यांवर कमी-अधिक प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत.पावसामुळे या खड्ड्यांची परिस्थिती आणखी गंभीर झाली असून,नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.विशेषतः महिला,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.ऑगस्ट महिन्याचा निम्म्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्याप मुजविण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी,अशी मागणी दिपालीताई पाटील यांनी केली.तासगाव शहराच्या चारही बाजूंना मळेभाग असून या परिसरातील अनेक रस्ते कच्चे आहेत.त्यामुळे या भागातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात मुरूमाची आवश्यकता आहे.येत्या आठ दिवसांत शहरात मुरूम उपलब्ध करून देत रस्त्यांवरील खड्डे तातडीने मुजवावेत,अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान,साठेनगर शाळेचे क्रीडांगण,लोकनेते डी. एम. (बापू) पाटील क्रीडांगण, क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान यांसह शहरातील सर्व क्रीडांगणे व उद्यानांची नियमित स्वच्छता करण्यात यावी,अशी मागणीही दिपालीताई पाटील यांनी केली.
यावेळी कोमल कदम,रसिका आडसुळ,राणी पाटील,मधुरा टिंगरे, सपना माळी आदी उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या