प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: श्रावणातील पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक उत्सवाची रंगत देण्यासाठी नांद्रे येथे मंगळागौरी सांघिक खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्रीमती अण्णासाहेब गर्ल्स हायस्कूल, नांद्रे येथे ही स्पर्धा. उत्साहात पार पडणार आहे. या स्पर्धेत खेळ, गाणी, हळदी-कुंकू आणि आनंद सोहळा अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे.स्पर्धेतील विजेत्या संघाला ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार १११ रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.स्पर्धेचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे निवेदिका सौ. मंजिरी लोंढे-घाटील यांच्या सादरीकरणातून‘क्षण सुखाचे’ हा विशेष गेम शो होणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी महिलांसाठी विविध मजेदार फनी गेम्स आयोजित करण्यात आले असून, उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढून विशेष बक्षिसेही दिली जाणार आहेत.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ५०० रुपये असून, नोंदणीची अंतिम तारीख ३ सप्टेंबर २०२६ आहे.प्रत्येक संघातील सदस्य संख्या दहा किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. मंगळागौरीचे खेळ व पेहराव पारंपरिक पद्धतीचे असतील. खेळासाठी प्रत्येक संघाला किमान १२ व जास्तीत जास्त १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून, गाण्यांची पेनड्राईव्ह कार्यक्रमाच्या एक तास आधी जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.या उपक्रमाची संकल्पना कोमल दीपक पाटील(मोनू) यांची असून, जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा आनंद घ्यावा, असे आवाहनआयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या