सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग १४ मधील आर्थिक दुर्बल घटकातील ५० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी हरिपूर रोडवरील गुळवणी महाराज मठामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि पश्चिम मंडल तसेच प्रभाग १४ मधील पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम एकत्रित पाहिला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, नगरसेवक केदार खाडिलकर, उदय बेलवलकर, मनीषा कुकडे, अनिता पवार, पश्चिम मंडळ अध्यक्ष रवींद्र वादवणे, जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर , शोभा राजमाने यांच्यासह प्रभाग १४ मधील भाजप पदाधिकारी हजर होते.
कार्यक्रमाचे संयोजन पालकमंत्री कार्यालयाच्या वतीने श्रीवल्लभ कुलकर्णी, संकेत कुलकर्णी तसेच योजनादूत विभागाच्या कार्यकर्त्यांनी केले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या