सांगली प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज , छत्रपती खा .उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्यावर काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर काही नीच प्रवृत्तीच्या लोकांकडून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या. छत्रपती घराण्याच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचवणारे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संकल्प युवा संघटनेकडून देण्यात आला आहे. सोशल मीडियावर छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करणाऱ्यांनी जिभेला आवर घालावा, अन्यथा आमच्या संतापाला सामोरे जावे लागेल व चुकीच्या काम करणाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा संकल्प युवा संघटना प्रमुख सागरभैया खंडागळे यांनी दिला आहे.
सोशल मीडिया मध्ये व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी दुरुपयोग करून चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर होता कामा नये. सर्वच महापुरुषांच्या अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत कोणतेही चुकीचे वक्तव्य अथवा कमेंट्स खपवून घेतल्या जाणार नाही.
खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांचे समाजकारणात सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे दिलदार व्यक्तिमत्त्व असून गोरगरीब तसेच संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्यक्तीविषयी अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरणे अत्यंत चुकीचे असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. उदयनराजेंवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे प्रशासनाने संबंधित प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन कायद्यानुसार अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाईची आम्ही मागणी करत आहोत जेणेकरून पुन्हा कोणी असे प्रकार करणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या