सांगली प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स प्रतिबंध तसेच पुनरुत्पादक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी सांगली येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटल, सांगली ते झुलेलाल चौक आणि पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल असा रॅलीचा मार्ग होता. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. गुरव, डॉ. पवार मॅडम व मनीषा सौंदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या वतीने कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉ. सतीश पाटील, प्राचार्य तथा रेड रिबन क्लब (RRC) समितीचे अध्यक्ष डॉ. प्रताप भोसले, उपाध्यक्ष डॉ. अंजली कुलकर्णी व कार्यक्रम प्रमुख डॉ. श्रुती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषद, RRC समितीचे विद्यार्थी तसेच फ्लॅशमॉबच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषवाक्ये, फलक तसेच प्रभावी फ्लॅशमॉब सादर करून एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, सुरक्षित आरोग्य आणि आरोग्यविषयक जागरूकतेचा संदेश दिला.
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्लॅशमॉबला प्रथम क्रमांक मिळाला. सर्जनशील सादरीकरण, प्रभावी जनजागृती संदेश आणि उत्कृष्ट सांघिक सहभाग यामुळे या फ्लॅशमॉबने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
उपाध्यक्ष डॉ. अंजली कुलकर्णी व कार्यक्रम प्रमुख डॉ. श्रुती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल सहभागी सर्व विद्यार्थी, विद्यार्थी परिषद, RRC समितीचे सदस्य तसेच मार्गदर्शकांचे संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील व विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील यांनी अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या