प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या सचिवा ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात झाला.
प्रारंभी ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.प्र.प्राचार्य डॉ.रत्नाकर म्हस्के यांनी ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांचे कार्य शिक्षण, संस्कार व सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. देवदत्त खजूरकर, डॉ. अर्चना चिखलीकर, प्रा. अंकुश पंडित, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रमोद शेंडगे, प्रशासकीय सेवक संजय कुंभार, हणमंत वाघमारे, सुजाता हजारे, अस्मिता साळी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या