संग्रामपूर प्रतिनिधी : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने २२ वर्षीय तरुणी तब्बल २०० किलोमीटरचाप्रवास करून संबंधित युवकाला भेटण्यासाठी सोनाळायेथे आली होती. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर तिला आपल्या निर्णयाची चूक लक्षात आली.
पोलिसांची तत्परता
या घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तरुणीची सुरक्षितता सुनिश्चित केली. तिच्याशी सविस्तर संवाद साधून सोशल मीडियावरील आभासी नातेसंबंध, त्यातील धोके, तसेच अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवण्याचे संभाव्य परिणाम याबाबत समुपदेशन करण्यात आले.
यानंतर सोनाळा पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पालक सोनाळा येथे आल्यानंतर त्यांच्यासमोरही समुपदेशन करण्यात आले. आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
पोलीस निरीक्षकांचे आवाहन
यावेळी सोनाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप काळेयांनी तरुण-तरुणींना आवाहन केले की,
सोशल मीडियावरील ओळख किंवा आभासी प्रेमाच्या आहारी जाऊन कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. संबंधित व्यक्तीची खातरजमा न करता भेटण्यासाठी एकट्याने प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. स्वतःचे भविष्य, शिक्षण, आयुष्य यावर लक्ष केंद्रित करावे. कोणतीही संशयास्पद किंवा फसवणुकीची घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
सोनाळा पोलिसांच्या तत्परतेमुळे एक संभाव्य अनर्थ टळला असून, या घटनेतून युवक-युवतींसह पालकांनीही सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
-पोलीस निरीक्षक संदीप काळे
पोलीस स्टेशन सोनाळा
अलीकडच्या काळात शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी मुली बाहेर पुणे मुंबई सारख्या शहरात आपले घर आई वडील यांना सोडून राहत आहेत.शहरातील मोकळे वातावरण,कुणाचा धाक नाही, आणि सोशल मीडिया मुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे. मुलामुलींना एकत्र येण्यात काहीही वाटत नाही.उलट त्यात त्यांना आधुनिकता दिसते. मुलांचा प्रश्न नाही पण मुलींना पण काही साधन सुचिता राहिली नाही. लाज, अब्रू वगैरे गोष्टी फक्त शब्द कोशातच राहिल्या आहेत. उलट मुलींमध्ये अंगप्रदर्षण वाढले आहे.संस्काराचा अभाव, लवकर मिळणारा पैसा, चैन, चंगळवाद, काही ध्येय नाही, आपण म्हणता तशा आभासी जगात ही मुले मुली राहत आहेत म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे.
उत्तर द्याहटवा