प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट बँक म्हणून नावारुपास आलेली दि तासगांव अर्बन को-ऑप. बँक लि.,तासगांव ची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात कोहीनूर हॉल,येथे पार पडली.सभेचे प्रास्तावीक संचालक विनय शेटे यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करणेत आले.सभेच्या सुरुवातीस उपस्थित सर्व सन्माननीय सभासद बंधू व भगीनींचे स्वागत बँकेचे संचालक महेश्वर हिंगमिरे यांनी केले.
तद्नंतर अहवाल सालात दिवंगत झालेल्या थोर राजकीय नेते,संशोधक,शास्त्रज्ञ,लेखक, साहित्यिक,कलाकार,खेळाडू तसेच सीमेवरील शहीद जवान यांना श्रद्धांजली चा ठराव संचालक राजेंद्र माळी यांनी मांडला.त्यानंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहुन श्रध्दांजली वाहनेत आली.
यावेळी बँकेचे अध्यक्ष कुमार शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निश्चित करणेत आलेल्या व्यवसाय वाढीच्या धेय्यानुसार अहवाल सालात बँकेकडील एकूण ठेवी रक्कम रु. ३०५.०९ कोटी, कर्जे रु. १८१.७४ कोटी असा एकूण ४८६.८३ कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.अहवाल सालामध्ये बँकेस रु. ३.६३ लाख इतका निव्वळ नफा मिळाला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बँकेचा निव्वळ एनपीए प्रमाण ० टक्के तर सीआरएआर १२ टक्के इतका आहे. बँकेचे सभासद,ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेची प्रगती सुरु आहे.आपल्या सर्वांच्या सहकार्याने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये बँकेचा एकूण व्यवसासाय रु.६०० कोटी पर्यंत नेणेचा बँकेचा मानस आहे.सध्या बँकेच्या १२ शाखा कार्यरत असून पुढील काळामध्ये सातारा व कोल्हापूर या जिल्हयामध्येही बँकेच्या शाखा विस्ताराचा संचालक मंडळाचा मानस आहे. बँकेच्या सभासदांनी आपले सर्व बँकिंग व्यवहार हे आपल्या बँकेमार्फतच करावेत असे सभेमध्ये आवाहन केले.मा. अध्यक्ष यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सर्व सभासदांना १२ टक्के डिव्हिडंड जाहिर केला.मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सगरे यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले.सर्व विषयांवर सभेमध्ये झालेल्या चर्चेत सभासदांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.बँकेचे सभासद भोसले साहेब,नगरसेवक सतिश लिंबळे व इतर मान्यवर सभासद यांनी बँकेचे कामकाज पारदर्शक व रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सुरु असून बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करुन संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले.
तसेच गुणवंत विद्यार्थी,७१ वर्षे पुर्ण झालेले ज्येष्ठ सभासद यांचा यथोचित सत्कार करणेत आला.त्याचबरोबत बँकेचे सभासद सौ.विजयाताई पाटील यांची तासगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी निवड झालेबद्दल, प्रसाद पैलवान यांची तासगांव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झालेबद्दल, क्राईम ब्रान्च कडील सागर टिंगरे यांना महाराष्ट्र शासनाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (उत्कृष्ट सेवा पदक) मिळाल्याबद्दल, सचिन मुगरदंड यांची सहा जिल्हयांच्या विभगीय इन्स्टिट्युट ऑफ व्हॅल्युअर्सच्या संचालकपदी निवड व मिलींद सुतार यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्यपदी निवड झालेबद्दल तसेच अन्य मान्यवर यांचा सभेमध्ये सत्कार करणेत आला.
बँकेचे व्हा. चेअरमन अनिल कुत्ते यांनी उपस्थित सर्व सभासद बंधू भगीनिंचे आभार मानले.
अशा पध्दतीने बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी बँकेचे सर्व सन्माननीय सभासद,चेअमन कुमार शेटे,व्हा.चेअरमन अनिल कुत्ते,संचालक महेश्वर हिंगमिरे,सदाशिव शेटे,अरुण पाटील,विनय शेटे,उदय वाटकर, धोंडीराम सावंत,रामशेठ शेटे, राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, उदय डफळापूरकर,आशिष अडगळे, श्रीमती सविता पैलवान,सौ.उमा हिंगमिरे,व्यवस्थापन मंडळ सदस्य अवधूत गडकर,रविंद्र देवधर, प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सगरे,असि. जनरल मॅनेजर विनायक मेंडगुले, सर्व स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या