सांगली प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाढत्या कुत्र्याचा हल्ल्या लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रामध्ये डॉग शेल्टर निवारा केंद्र लक्ष्मी फाटा, सांगलीवाडी कचरा डेपोजवळ उभा करण्यासाठी निवेदना द्वारे आम्ही महापालिकेकडे मागणी केली होती. महापालिकेचे त्यावेळेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्याचा आराखडा तयार करून ठेवला असून अद्याप निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले, तेव्हा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या वतीने पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सदर डॉग पाउंड, डॉग सल्टर साठी निधीची मागणी केली व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी *हिंदू एकता आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेऊन लक्ष्मी फाटा सांगलीवाडी कचरा डेपो जवळ जागा संपादित करून त्यावर डॉग शेल्टर बांधण्यासाठी निधी जिल्हा नियोजन समिती मधून 2 कोटी 51 लाख रुपयेचा निधी महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला.*
तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांनी शाळा सुरु होण्यापूर्वी डॉग पाउंड,डॉग शेल्टर उभा करणार असे सांगितले होते. तरी डॉग पाउंड, डॉग शेल्टर निवारा केंद्राचे काम अद्याप चालू झालेले नाही. तरी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये दररोज भटकी कुत्री नागरिकांवर हल्ले करीत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने, प्रशासनाने यात लक्ष घालून तातडीने युद्धपातळीवर डॉग पाउंड, डॉग शेल्टर निवारा केंद्राची उभारण्या करावी, *अन्यथा हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे महापालिकेमध्ये कुत्री सोडण्यात येतील याची नोंद घ्यावी.* असे प्रसिद्धीपत्रक हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने दिले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पै.प्रदीप निकम, राजू जाधव, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, भूषण गुरव, अवधूत जाधव, दिग्विजय शिंदे, हार्पितसिंघ गौड, अनिकेत अबरूळे, राम काळे, विकास आवळे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या