कसबे डिग्रज : कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्सच्या वतीने आयोजित *युवा संसद स्पर्धेत* महावीर स्टेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच सहभागात दैदिप्यमान यश मिळवले आहे. या स्पर्धेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित *'संसद रत्न' पुरस्कार* प्रदान करण्यात आला.
कुमारी वेदिका पाटील, कुमार दर्पित ताटे, कुमार आयुष पाटील, कुमारी स्वरा पाटील आणि कुमारी स्वस्तिका व वाडकर या विद्यार्थ्यांनी वर्गातून थेट संसदेपर्यंतचा प्रवास करताना उत्कृष्ट वादविवाद केला, नेतृत्व दाखवले आणि विजय मिळवला. तरुण मनातील मोठ्या कल्पनांना आता व्यासपीठ मिळाले.
विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या *श्रीमती अल्का भांडवले मॅडम आणि श्री. जयकुमार चव्हाण सर* यांच्या या यशात मोठे योगदान आहे.
या यशाबद्दल महावीर स्टेट अकॅडमीच्या वतीने कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स व सहोदयाचे अध्यक्ष जी.बी पाटील सरांचे मनःपूर्वक आभार.
या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री पाटील मॅडम, संस्थेचे संस्थापक डी. डी. चौगुले सर, अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील सर व संस्थेचे सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या