प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)च्या एमपीएसपीएल हजारवाडी टीमतर्फे तासगाव तालुक्यातील निमणी येथील पाचवा मैल बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.एचपीसीएलच्या अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.स्वच्छता पंधरवडा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाचे नेतृत्व एमपीएसपीएल हजारवाडीचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक जी.जगदीप वर्मा यांनी केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक परिसरातील कचरा हटविणे,परिसर स्वच्छ करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.या अभियानात सहाय्यक व्यवस्थापक (ऑपरेशन्स) देवेश सिंह, ऑपरेशन्स अधिकारी अर्श मोहन, ओम जाधव, अंशु सिंह, दिव्यांशु, मुख्य डेपो व्यवस्थापक शहाजी देवडा, तसेच सिक्युरिटी सुपरवायझर रमेश सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग नोंदविला.
यावेळी निमणीचे माजी उपसरपंच आर.डी.पाटील, सदस्य डॉ. दिपक पाटील, विनय सपकाळ,नागावचे दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील,वसगडेचे माजी सरपंच श्रेणिक पाटील तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत स्वच्छ आणि निरोगी परिसरासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनसहभाग यांचा प्रभावी संगम या उपक्रमात पाहायला मिळाला.एचपीसीएलच्या या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ होण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली. 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून बळ देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या