पलूस प्रतिनिधी : राजकारणात घराणेशाही किंवा वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना राजकारणात संधी उपलब्ध करून देऊ. आणि भागाचा विकास करून दाखवू, असा निर्धार व्यक्त करत समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून काम करणारी नवी पिढी घडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांनी दिले.
अंकलखोप येथे प्रदेश सरचिटणीस डॉ प्रतापनाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील माळवाडी, अंकलखोप, नागठाणे, भिलवडी, खंडोबाची वाडी, धनगाव, भिलवडी स्टेशन, पलूस येथील पाचशेहून जास्त युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रदीपआप्पा कदम बोलत होते.
अंकलखोप येथील दौलतराव पाटील,
सचिन कुराडे, विनायक कुराडे, चंद्रकांत ठोंबरे, माळवाडी येथील कैलास वासूदेव , प्रितम जगदाळे, भिलवडी येथील अमन मुलाणी, अभिषेक ओलेकर, कृष्णा केक उद्योगाचे सलमान सुतार, एम. पी. के. ग्रुप, प्रतीक कांबळे, नागठाणे येथील अल्फाज मुल्ला, भिलवडी स्टेशन येथील सौरभ मदाळे, अशोक माने, महेश जाधव यांच्यासह प्रत्येक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
प्रथमता सर्वांचे स्वागत संजय शिंदे यांनी केले प्रास्ताविक कुलदीप वारे यांनी केले, अमिर पठाण, राहूल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजीत सावंत यांनी आभार मानले. शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील, तुषार सुर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारा मी एक कार्यकर्ता आहे, स्वर्गीय अजितदादांनी दिलेला शब्द पाळणारा, काम करणारा नेता अशी प्रतिमा निर्माण केली. त्यांचा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने कृतीतून पुढे नेला पाहिजे. केवळ नाव घेऊन चालणार नाही, तर त्यांच्या विचारांच्या पायवाटेवर चालत समाजहिताचे कार्य करावे लागेल.
प्रदीपआप्पा कदम पुढे म्हणाले, "तालुक्यातील बेरोजगारी, क्षारपड जमिनीचा प्रश्न, शेतीमालाला योग्य बाजारभाव, उसाचे घटते उत्पादन, द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न यासह सर्व प्रश्नांवर एकत्रितपणे काम केले जाईल." "शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल.
पलूस तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमध्ये सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयांचा उल्लेख करत कदम म्हणाले, "ही कार्यालये आठवड्याचे सातही दिवस नागरिकांच्या सेवेसाठी खुली असून शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लोकांची कामे प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील."
युवकांना उद्देशून ते म्हणाले, "कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता माझ्यावर आणि पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला जाईल. चांगले, सुसंस्कृत राजकारण उभे करून पालकांच्या मनात आपल्या मुलांना राजकारणात पाठवण्याचा विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज आहे."
तालुक्यातील एकही युवक चुकीच्या मार्गावर जाऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत कदम म्हणाले, "राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी, युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या विकासासाठी व्हावा, हीच आमची भूमिका आहे. तुम्ही दोन पावले पुढे आलात तर मी चार पावले पुढे येऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन. प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुसंस्कृत व्हावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया."
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रतापनाना पाटील म्हणाले पक्षात प्रवेश केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या कोणत्याही काम थांबणार नाही त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण केले जाईल. प्रदीप आप्पा कदम यांच्यासारखा एक लढवय्या नेता तुम्हाला मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून भागाचा विकास करून घ्या. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राहुल पाटील, अजित कांबळे, रणजित शिंदे, अमोल साळुंखे, उल्हास पाटील, भास्कर संकपाळ, अंकुश गस्ते, सागर कदम, अभिषेक झेंडे, बजरंग ढोले, प्रफुल पाटील,
महेश हजारे, स्वप्नील जाधव,
आरमान आत्तार, आकाश बिराजदार
प्रितम जगदाळे, अण्णा देवकुळे, राहुल वारे, विवेक रावळ, सौमेद परीट, गौतम पाटील, ओंकार परब, किरण परब, रोहित परब, अभिजित कदम, प्रसाद कदम, विकी तातुगडे,
स्वप्नील सुतार, गणेश वडूलकर यांच्यासह परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या