प्रतिष्ठा न्यूज
सांगली | प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरीपदी मारुती देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद तसेच महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मारुती देवकर यांनी पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत राज्यभर काँग्रेसच्या ओबीसी विभागाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी माझ्या क्षमतेपेक्षाही अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करेन," असे त्यांनी सांगितले.
तसेच सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांचे हात बळकट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मारुती देवकर यांनी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या