सांगली प्रतिनिधी : स्वा. सावरकर प्रतिष्ठान संचलित, प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेचे परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण यादीत एकूण 06 विद्यार्थी झळकले.
इयत्ता 5 वी मध्ये चि.देवेंद्र संजय दुधाळ 236 गुण मिळवून शहरी सर्वसाधारण यादीत 55 वा,चि. मिहीर आशिष घाडगे 226 गुण मिळवून शहरी सर्वसाधारण यादीत 85 वा, इयत्ता 8 वी मध्ये कु. वेदिका अविनाश गायकवाड 236 गुण मिळवून शहरी सर्वसाधारण यादीत 68 वी, कु. ईश्वरी आनंदा माने 218 गुण मिळवून शहरी सर्वसाधारण यादीत 28 वी, चि.अर्णव अजित गडचे 216 गुण मिळवून शहरी सर्वसाधारण यादीत 132 वी, चि.सुमित लक्ष्मण कडोले 216 गुण मिळवून शहरी सर्वसाधारण यादीत 134 वा आला आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुबोध कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री.संदीप वरठा , सौ. मेघा किल्लेदार सौ. अनुपमा जोशी , सौ.प्रीती घैसास , सौ.प्रियांका इचलकरंजे, सौ.रुचिरा कांबळे, सौ.राधिका जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा कौतुक सोहळा शाळेमध्ये संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. विजय नामजोशी उपाध्यक्ष भास्कर कुलकर्णी ज्येष्ठ सदस्य मधुकर वझे नंदकुमार जोग त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या