प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २९ : श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेचा कार्यक्रम डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर येथे उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून संगीत गुरु व संगीत विशारद तज्ञ मनीषा फाटक उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या सहगायक कलाकार कीर्ती आठवले, निशा पाटणकर, अश्विनी दिवेकर, स्वाती व रमा जोशी यांच्या साथीने जादुई मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला.भावगीत, भक्तिगीत व सिनेगीतांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः पंढरीच्या वारी निमित्त विठ्ठलभक्तीची गाणी व पावसाळी गाणी गाताना सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले. प्रकाश बापट यांनी तबल्यावर उत्तम ठेका दिला तर प्रवीण लिमये यांनी हार्मोनियमची साथ केली.या सर्व कलाकारांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी केला. कार्यक्रमाचे आयोजन गुरुनाथ जोशी, स्मिता गोडबोले व स्मिता कुलकर्णी यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या