सांगली, दि. २९ : शिवतांडव ढोलताशा पथकाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. कृष्णा माई घाटाची स्वच्छता करणारे श्री सतीश दुधाळ, शेकडो तरुणांना पोलीस व आर्मी भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देणारे श्री अविनाश बापू सावंत, वृक्षारोपण करणारी हरित क्रांती संघटना, गोरक्षक श्री अंकुश गोडसे, तृतीयपंथीयांना मदत करणारे देव अमोल व देव सुजाता, तरुणांना पोहायला शिकवणारे श्री दीपक सडलगे, लेझीम शिकवून मल्लखांब खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर नेणारे श्री नामदेव लिमये, आशा वर्कर सौ. रेखा पाटील, तरुणांना डान्स अकॅडमीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावून देणारे श्री सुमित साळुंखे, तसेच मुलांना गडकोट मोहिमेद्वारे ट्रेकिंगला नेणारे श्री सोमनाथ पतंगे यांना ‘शिवतांडव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.हा पुरस्कार माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज भैय्या पवार, आयर्न मॅन प्रसाद दीक्षित, नगरसेवक केदार खाडिलकर, बाळासाहेब बेलवलकर व संदीप कुकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पथकाचे अध्यक्ष अभिजीत ओतारी, संस्थापक राहुल बोळाज तसेच ढोलताशा पथकातील शेकडो वादक उपस्थित होते.
शिवतांडव ढोलताशा पथकाच्या दशकपूर्ती सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
By -
जुलै २८, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या