मिरज: केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाची संस्कृती जिवंत केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ प्राजक्ता पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, वारकरी आणि संतांच्या वेशभूषेत साकारलेली रूपे सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली हार्डी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. वारकरी परंपरेतील समता, सेवा, भक्ती आणि सदाचार यांसारख्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूtर , समन्वयिका अश्विनी येळकर उपस्थित होते . तसेच शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त ॲड, वीरेंद्र पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख होऊन भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या