पलूस प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या जनसेवा सप्ताहा अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, तिसऱ्या दिवशी महापुरुषांच्या स्मृतीस्थळांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे येथील स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम वृक्षारोपण कार्यक्रम ही राबविण्यात आला . यावेळी स्मारक परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई, कचरा संकलन, परिसर निर्जंतुकीकरण आदी कामे करण्यात आली.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी अंकलखोप येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारक स्थळाचीही स्वच्छता केली. महापुरुषांच्या विचारांचे जतन व स्मृतीस्थळांचे संवर्धन ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदीप आप्पा कदम यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यांनी स्वर्गीय अजितदादांच्या जनसेवेच्या विचारांना अभिवादन करत कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन केले.
या अभियानात आमणापुरचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम कांबळे, कुलदीप वारे, विजय खारकांडे, महेश हजारें, आमिर पठाण, राहुल पाटील, तुषार सूर्यवंशी, पलूस बाजार समिती संचालक तौफिक मुल्ला, रणजीत शिंदे, उल्हास पाटील, अनिल पाटील, अभिजीत कौलगे, भास्कर संकपाळ, अंकुश गस्ते, विकी तातुगडे, सौमेद परीट, निवास गायकवाड, सुवर्णा शिंदे (रामापुर), रुकसाना मरणे (देवराष्ट्रे), मधुकर शिंदे, जयकर काळे, अजय मिसाळ (मोहिते-वडगाव), सागर तांदळे (अंबक-चिंचणी), अमोल माने, वेगवान शिंदे, विजय पवार, श्रींकात मोरे (मसुचीवाडी), संदीप जमदाडे (कुंभारगाव), प्रविण कांबळे (वांगी), सुरज मुल्ला, शाहनुर फकीर, नजिर फकीर, दस्तगिर आगा, बाळू फकीर, अभिजीत कदम, विजय परबत, आदित्य धनवडे, अक्षय व्हरे, संदीप वारे नेते, अरविंद लांडगे, कृष्णा लांडगे, महेश पानसरे, विनय बिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या